ऑडियो स्वरुपातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी ?

ज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.

जॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल

Do you want to Open or Save ?

इथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील "ज्ञानेश्वरी" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.

------------------------
टीम ई-साहित्य प्रतिष्ठान

नाशिक येथील श्री. विजय बळवंत पांढरे ह्यांनी 

"ज्ञानेश्वरी" चा 

साध्या सॊप्प्या भाषेत केलेला भावार्थ 

आपल्या सर्वांसाठी ऒनलाईन घेऊन येत आहे

"ई-साहित्य प्रतिष्ठान" 

---------------

www.facebook.com/edyaneshwari
esahity@gmail.com
-------------------- श्री. विजय बळवंत पांढरे --------------------

संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहीलेल्या श्रीज्ञानेश्वरीचे, आणि श्रीमद्भगवदगीता सामान्य लोकांना समजेल अशा मराठी भाषेत ओवीबद्ध रुपांतर करणारे श्री विजय पांढरे यांना आपण ओळखतोच. गेले काही महिने ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े त्यांनी लिहिलेल्या भावार्थ ज्ञानेश्वरीचे ई वितरण आम्ही लाखो लोकांपर्यंत करत असतो. ज्ञानेश्वरीचे वाचन आजच्या तरुणांनी करावे या हेतूने ते अथक परिश्रम घेत असतात. जगभरातील किमान दहा लाख लोकांनी या ज्ञानेश्वरीचा अनुभव घेऊन तिच्याद्वारे मूळ ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेतला. श्री विजय पांढरे यांनी हे वितरण करण्यासाठी आपली पुस्तके विनामूल्य आमच्या हाती सोपवली. 

श्री विजय पांढरे हे मेरी या महाराष्ट्रातील सर्व इंजिनियर्सना प्रशिक्षण देणार्या संस्थेचे प्रमुख इंजिनियर आहेत. मेरी ही संस्था नाशिक येथे ४०० एकरच्या परिसरात वसलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी इंजिनिर्सना येथे प्रशिक्षण दिले जाते. याच बरोबर श्री विजय पांढरे हे महाराष्ट्रातील सर्व धरणांच्या क्वालिटी आणि सेफ़टीची पहाणी करणार्या विभागाचे प्रमुख आहेत. मंत्रालयातील व विधानसभेतील जलसंसाधन विभागाशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाब्दारी त्यांच्यावर सरकारने सोपवली आहे. एवढ्या उच्च पदावर काम करणारे श्री पांढरे श्री क्षेत्र आळंदी येथे नियमितपणे प्रवचन करतात. स्वतः अत्यंत साधी रहाणी जगतात. वेळ मिळेल तसे आपल्या शेतावर रमतात. कोणत्याही प्रकारचा बडेजाव त्यांच्या ठिकाणी आढळत नाही. आपल्या गावावर आणि गावच्या मातीवर प्रेम करणारा हा एक उच्चपदस्थ अधिकारी आहे. महाराष्ट्राच्या सरकारी खात्यात असे ईमानदार आदर्श लोक आहेत याचा आम्हाला एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे.

अशा श्री. विजय पांढरे यांनी त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर आणला म्हणून त्यांच्यावर सध्या उच्च दर्जाच्या मंत्र्यांकडून हीन दर्जाची टीका सुरू करण्यात आली आहे. आम्ही या चिखलफ़ेकीचा निषेध करतो. आणि श्री विजय पांढरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे जाहीर करतो.

ई साहित्य प्रतिष्ठान

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥

श्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ सांगीतिक पारायण ॥

भावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे

॥ विठु माऊली ॥

॥ विठु माऊली ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ वारी ॥

॥ वारी ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

Follow by Email