ऑडियो स्वरुपातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी ?

ज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.

जॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल

Do you want to Open or Save ?

इथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील "ज्ञानेश्वरी" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.

------------------------
टीम ई-साहित्य प्रतिष्ठान

॥ज्ञानेश्वरी ई पारायण अभियान॥

जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांपैकी श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. त्यात परमार्थ तर आहेच. पण परमार्थाची सुरूवात मनुष्य जन्म उत्कृष्टपणे जगण्यातून होते. कसे जगावे याचे उत्कृष्ट विवेचन सुंदर रितीने ज्ञानेश्वरीत केले आहे. प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजेत असे ग्रंथ म्हणजे छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि श्री ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी प्रत्येक मराठी माणूस वाचतोच असे नाही. कारण १२९१ साली प्रचलित असलेल्या प्राकृतबहुल मराठीत लिहीलेली ज्ञानेश्वरी आजच्या तरुणांना समजायला कठीण जाते. अनेकजण प्रयत्न करतात पण नंतर सोडून देतात. कारण प्राकृत भाषा आजच्या तरूणाच्या ओळखीची राहिलेली नाही. अशा वेळी ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे  २१व्या शतकातील सोप्या मराठीत ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरी.

रोजचा केवळ अर्धा तास, असे फ़क्त एकोणतीस दिवस वाचन करून आपण ज्ञानेश्वरीचे पूर्ण पारायण करू शकता.  श्री विजय पांढरे लिखित २१व्या शतकासाठी ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरीची भॆट आम्ही आज ई साहित्य प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून सादर करीत आहोत.  ही ज्ञानेश्वरी मूळ ज्ञानेश्वरीप्रमाणेच ओवीबद्ध असून समजायला खूपच सोपी झाली आहे. मूळ प्राकृत ज्ञानेश्वरीइतकीच रसाळ. या ज्ञानेश्वरी सोबत मूळ ज्ञानेश्वरीचीही ई प्रत विनामूल्य उपलब्ध आहे.

जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी
आमचा असा संकल्प आहे की ही ई ज्ञानेश्वरी जगातल्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्क टॉपवर असायला हवी.  जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी हे अभियान आम्ही राबवणार आहोत. या अभियानात आम्हाला हजारो मनगटांबरोबरच लक्ष लक्ष मराठी मनांची आणि मराठी हृदयांची गरज आहे.
आपल्या जीवनातील चिंता, भय, तणाव, दुःख अदृश्य होऊन जर सुंदर , शांत,निरामय आयुष्य अनुभवायचे असेल तर संतांचा निरोप, संतांचा उपदेश समजावून घ्यावा लागेल. व त्यानुसार सहज निष्काम जीवन आपल्याला स्वतःच्याच अंतरंगांतून शोधावे लागेल. त्याशिवाय मानवी दुःख दूर होऊच शकत नाही. केवळ भौतिक प्रगतीने आणि भौतिक साधनांनानी सुख व तृप्ती लाभूच शकत नाही. म्हणून भय, चिंता व तणावातून मुक्ती हवी तर माऊलींनी सांगितलेला शांतीचा, समाधानाचा, दुःख मुक्तीचा व मनःसमत्वाचा मार्ग समजून घ्यावा लागेल.

या भावार्थ ज्ञानेश्वरी बरोबरच त्यावर आधारित बावीस चिंतने वाचावी. त्यातून आपल्याला आपल्या मनाचा खेळ समजू लागतो. मन समत्वाकडे वळू लागते. निष्कामता, निर्विकल्पता समजायला लागते. आत्मसंमोहनाचा निरास होत मनुष्य दुःखांतून मुक्त होतो. ज्ञानेश्वरीचा हाच गाभा होय. आजच्या धकाधकीच्या, स्वकेंद्रित जीवनात ज्ञानेश्वरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण मराठी असण्याचा हा एक फ़ायदाच म्हणा की इतका सुंदर ग्रंथ आपण मूळातून वाचू शकतो. आणि स्वतः एकटेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना , आप्तमित्रांनाही हा सुखाचा मार्ग दाखवू शकतो. म्हणून आम्ही ही ज्ञानेश्वरी विनामूल्य आणि मुक्त वितरणासाठी उपलब्ध करून देत आहोत.

ज्ञानियांनी म्हटल्या प्रमाणे
सर्वत्र वेद यज्ञाचा घाट।
अन् सुविद्येचा झडझडाट ।
वारा सत्वगुणाचा सोसाट।
वाहू लागे॥

अशी सुसाट सुगंधी वार्‍यासारखी ज्ञानेश्वरी सर्वत्र पसरवावी. तशी ज्वलंत आणि तीव्र ईच्छाशक्ती असणार्‍या सर्व वयाच्या वाचकांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण जर अजून १० लोकांपर्यंत ही ज्ञानेश्वरी पोहोचवू शकत असलात आणि त्यातल्या काहींनी तरी ती पुन्हा दहा लोकांपर्यंत पोचवली तर ते एक महत्त्वाचे काम होईल. अगदी एका नवीन माणसापर्यंत हा संदेश गेला तरीही. सहस्त्र बाहू,लक्ष मने या कार्यात लागले तर हा गोवर्धन सहज उचलू शकतील. आपल्या संपर्कात काही प्रसार माध्यम असेल तर हे काम अधिकच सोपे होईल. आपल्या हाती जे असेल ते साधन वापरून आपण या ज्ञानियांच्या राजाच्या ज्ञानानुभवाचा प्रसार करूया. ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश सर्व जगात सुगंधासारखा पसरो आणि सर्व जीव सुखी होवोत अशी प्रार्थना करून या कामाला सुरूवात करूया.

सामिल होण्यासाठी लिहा : esahity@gmail.com
संपूर्ण ज्ञानेश्वरीसाठी भेट द्या : www.esahity.com
Facebook वर पहा :  http://www.facebook.com/edyaneshwari
ब्लॉगला भेट द्या : http://edyaneshwari.blogspot.in/

या शिवाय या ज्ञानेश्वरीचे तीस तासांचे सांगीतिक पारायण उपलब्ध असून कोणाला FM Radio किंवा तत्सम प्रसार माध्यमासाठी हवे असल्यास संपर्क साधावा. हॆ सांगितिक ई पारायण लवकरच स्वरनेटाक्षरी या ई साहित्य प्रतिष्ठानच्या ऑडिओ वेबसाईटवर उपलब्ध हॊईल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥

श्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ सांगीतिक पारायण ॥

भावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे

॥ विठु माऊली ॥

॥ विठु माऊली ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ वारी ॥

॥ वारी ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

Follow by Email