ऑडियो स्वरुपातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी ?

ज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.

जॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल

Do you want to Open or Save ?

इथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील "ज्ञानेश्वरी" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.

------------------------
टीम ई-साहित्य प्रतिष्ठान

ई-साहित्य प्रतिष्ठान - एक ऒळख
: ई साहित्य प्रतिष्ठान :

दिशा एका दिंडीची

हा एका झंझावाताचा काळ आहे. या झंझावाताचं नांव आहे इंटरनेट.
झंझावातापुढे वृक्ष कोसळतात. लव्हाळें वाकतात आणि वाचतात. पण कोणी असतात जे झंझावात शिडांत भरून प्रवासास निघतात.  क्षितीजं पार करतात. नवे मुलुख पादाक्रांत करतात.

मराठी साहित्याच्या सेवकांतही असे अनेक आहेत. अनेक वेबसाईट्स आहेत. अनेक नेटग्रुप्स आहेत . त्यातलेच आम्ही एक. ओर्कुटवर कवितांच्या कम्म्युनिटींत आम्ही भेटलो. ओळख झाली. व्हर्च्युअल मैत्री झाली. समक्ष गाठीभॆटींत आम्ही जवळ आलो. मैफ़ली केल्या. शिबीरं भरवली. काव्यमय सहली केल्या.  ट्रेकिंगला गेलो. कार्यक्रम केले. नाशिक, नागपूर, पुणे इथे जसे कार्यक्रम केले तसे ते धारावीची झोपडपट्टी आणि बोरिवलीचा चौक, पुण्याच्या पब्लिक  बागा अशाही असंख्य ठिकाणी कवितांचे कार्यक्रम केले. कल्याणच्या कार्यक्रमात कवी प्रवीण दवणे आले. वाशीच्या भव्य कार्यक्रमात कवी अशोक नायगांवकरांनी प्रमुख अतिथीपद भूषवलं. नवरसरंग , ऋतुरसरंगसारख्या मराठी कवितेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. कवी संदीप खरेंसारखे परीक्षक लाभले. नवनवीन कवी लेखक, चित्रकार, कलाकार, गायक वादक जुळत गेले. ई वर्ले अक्षर सारखा दर्जेदार कार्यक्रम उभारला. कधी कवितांच्या जागर (रात्रभर जागरणाच्या) मैफ़ली केल्या तर कधी शुक्रपरिक्रमासारखी  आंतरराष्ट्रीय ऑनलाईन काव्यसंमेलनं भरवली. बघता बघता दिंडी जमत गेली. मग पुस्तक प्रकाशन, ई दिवाळी अंक असं करत नेटाक्षरी या ई नियत कालिकाची सुरुवात केली. आधी मासिक काढायचं ठरलं. पण कवी आणि वाचकांचा उदंड उत्साह बघून त्याचं साप्ताहिक बनलं. त्यापाठोपाठ आली भावंडं. कवींच्या आवाजात कविता ऐकायला स्वरनेटाक्षरी . बालकांचं  बाल नेटाक्षरी.  हास्यमय ई श्टाप. असं करता करता ई बुकांपर्यंत पोहोचलो. आणि मग एका मागून एक ई पुस्तकांची मालिका सुरू झाली.  इंटरनेटवर मराठी कसं लिहावं हे शिकवणार्‍या ई पुस्तकापासून ई शाळाही सुरू केली.  निरनिराळ्या ग्रुप्सनी या वेगवेगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी घेतली. संख्या वाढत गेली तशी गुणवत्ताही उंचावू लागली.

शिडांत भरलेलं इंटरनेटचं वारं आणि डोक्यात शिरलेलं मराठी साहित्याचं वेड पुढे कुठे नेईल माहित नाही. पण एवढं नक्की. ही प्रवासाची सुरूवात आहे. आणि पल्ला बराच मोठा आहे. टक्कर आहे ती लाखों ई बुक्सची निर्मिती करून संपूर्ण इंटरनेट व्यापलेल्या इंग्रजीशी. इंटरनेटचा सगळा पायाच मुळी इंग्रजी; आणि मराठी कितीही जुनी असली तरी इंटरनेटवर इंग्रजीच्या मानाने पिल्लूच.
पण बच्चे असलो तरी कच्चे नाही.  अमृताते पैजा जिंकणार्‍या मराठीची आण घेऊन आणि बड्या फ़ौजांशी झुंजा घेण्यार्‍या शिवबाचं स्मरण करून आम्ही या क्षेत्रातही मराठीचा दणकट ध्वज रोवत आहोत. माय भवानी आम्हांस बळ देईल आणि माय मराठीचा डंका येणार्‍या शत शत पिढ्यांपर्यंत गाजत  राहील असा विश्वास आहे.

 आमचा ५ सूत्री कार्यक्रम असा आहे :

१) जास्तीत जास्त मराठी नेट युजर्सपर्यंत पोहोचणं. त्यांच्याशी जिवंत संपर्क ठेवणं. त्यांना सतत मराठी साहित्य पुरवणं. त्यांच्यामार्फ़त त्यांच्या मित्र मैत्रिणींपर्यंत आपलं साहित्य नेणं. यातून वाचकांची एक साखळी बनवणं. या साठी ऑर्कुट, फ़ेसबुक पासून ते ब्लॉग, वेबसाईट, ई मेल अशी सर्व साधनं वापरणं. जगभरात पसरलेल्या सर्व मराठी ई मेल धारकांपर्यंत पोहोचणं हा ध्यास आहे.

२) जास्तीत जास्त मराठी लोकांनी मराठीत, मराठी भाषेत लिहून, इंटरनेट व्यवहार करावा असा प्रयत्न करणे. त्यांना  मराठी सॉफ़्टवेअर्सची माहिती देणं. त्यांच्यातील सर्जनशील बाजूला प्रोत्साहन देणं. नवीन लेखक व कवींना  लिहायला स्फ़ुर्ती देणं.

३) मराठी लेखकांना ई बुक्स व ई मॅगझीन मध्ये निर्मिती करायला प्रोत्साहित करणं. त्यांचं वितरण, जाहिरात करणं. त्यातील नवनवीन टेकनिक्सची माहिती देणं. जागतिक ट्रेंड्सची जाणिव देणं. जागतिक पटलावर हे साहित्य उपलब्ध करून देणं. त्यांची गुणवत्ता उंचावत रहाणं. सतत अद्ययावत रहाणं.

४) मराठी साहित्यात चोरी वा तत्सम गैरप्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेणं, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं. कायदेशीर बाजू भक्कम करणं. त्याचबरोबर त्याचा बाऊ करून ई साहित्याची निर्मितीच थांबवण्याची प्रवृत्ती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं. ई साहित्यविषयक कायद्यांचा पाठपुरावा करणं.

५) वरील सर्व कामं करण्यासाठी एक दणकट संगठना बांधणं. लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, इंजिनियर्स, वकील, वेब डिझायनर्स अशा तरूण उत्साही कार्यरत व्यक्तींची एक मजबूत फ़ळी उभी करणं.     त्याची आर्थिक आणि कायदेशीर बांधणी करणं. अनुभवी समविचारी मंडळींशी संपर्क साधणं. सरकारी, निमसरकारी, बिनसरकारी संस्था, साहित्य मंडळं यांच्यातून या कार्यासाठी पाठिंबा उभा करणं.   

अशी अनेक कामं येत्या काळात होणार आहेत. निरनिराळ्या संस्था अशा तर्‍हेची कामं स्वतंत्र रित्या करतच आहेत. अशा समविचारी सममार्गी संस्थांनी एकतर येऊन ही चळवळ जोमाने पुढे न्यावी आणि इंटरनेटच्या युगात मराठीची पताका डौलाने फ़डकत रहावी हीच अपेक्षा.  

***************************************

आता पर्यंत प्रकाशित झालेल्या २०० ई-पुस्तकांसाठी खालील संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

www.esahity.com

किंवा मेल करा
esahity@gmail.com

टीम ई-साहित्य प्रतिष्ठान

*******************
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥

श्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ सांगीतिक पारायण ॥

भावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे
ईमेल : vbpandhare@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई

॥ वारी २०१२ ॥

॥ वारी २०१२ ॥
छायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे

॥ विठु माऊली ॥

॥ विठु माऊली ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥

॥ वारी ॥

॥ वारी ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

पाडगांवकर सर भावार्थ ज्ञानेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.

Follow by Email